माझा स्वभाव कसा होता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माझा स्वभाव पहिल्यापासूनच अतिशय जिद्दी होता. आता तो तसा आहे किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही. पण लोक म्हणत असतील कि माझा स्वभाव अजूनही तसाच जिद्दी आहे.

माझ्या लहान पणाची गोष्ट सांगतो, मला वाटते मी इंग्रजी दुसरी इयत्तेत शिकत होतो. आमची शाळा होती साताऱ्याला कॅपमध्ये. त्यावेळी पेंडसे नावाचे एक मास्तर आम्हाला होते त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते माझा स्वभाव हट्टी आहे हे माझ्या सवंगड्यांना माहीत असल्यामुळे एखादी गोष्ट करू नकोस म्हणून मला सांगितल्या बरोबर मीती हटकून करणार हे त्यांना ठाऊक होते. एकदा खूप पाऊस पडला होता व आमच्या शाळेत जाण्याची वेळ झाली होती माझ्या मित्रांनी मला सांगितले, ” बघ रे बुवा, पाऊस पडतोय खूप, तू आपला पावसात जाऊ नकोस, उगाच  चिंब भिजशिल, मला तेच पाहिजे होते. माझा थोरला भाऊ छत्री घेऊन निघाला मी त्याला सांगितले तो आपल्या छत्री घेऊन जा कसा, मी एकटा पावसात भिजत येणार”  भावाने माझे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला पण मी त्याचे म्हणणे धुडकावून लावले. आमची स्वारी छत्री बित्री नं घेता पावसातून जायचे ठरवून निघाली. मी त्यावेळी वेलबुट्टीची टोपी वापरत असे. ती टोपी मी माझ्या भावाच्या स्वाधीन करून दिली तो पुढे निघून गेल्यावर मी पावसात भिजत भिजत शाळेचा रस्त्याने निघालो. पाऊस मुसळधार पडत होता मी शाळेत येऊन पोहोचलो होतो. काय अगदी नखशिखांत चिंब भिजलेला मास्तरांनी मला अशा स्थितीत पाहिल्यावर त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांनी मला विचारले हरी पावसात छत्री घेऊन का नाही निघालास? मी जवाब दिला, छत्री एकच होती दोघा भावांमध्ये एक म्हणून मी हा असा भिजलो.

ही माझी निवड थाप होती ते त्या भोळ्या मास्तरांच्या ध्यानात आले नाही त्यांनी माझ्या थोरल्या भावाला बोलावून घेतले तेव्हा तू इयत्ता चौथीत शिकत होता त्याला मास्तरांनी विचारले दाखव पाहू तुझ्या अंगात किती सदरे आहेत ते. माझ्या भावाच्या अंगात एकच साजरा होता. तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर आपल्या घरी पाठविले व त्यांना सांगितले घरी याला नीट गरम पाण्याने आंघोळ करायला पाणी दे त्याला एक लंगोटी दे आणि त्याचे कपडे म्हणजे धोतर आणि सदरा वाळत घालायला लाव म्हणजे संध्याकाळी ते घालून आपल्या घरी जाईल. त्याप्रमाणे मास्तरांच्या मुलाने मला आपल्या घरी नेऊन गरम पाण्याची अंघोळ घातली व नेसायला एक लंगोटी दिली.

संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला. मी टिवल्या बावल्या करीत व तोंडाने वाजवी तसाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो मी वर्गात आलो नाही असे पाहून मला वर्गात अन्यायाविषयी पुन्हा मास्तरांनी एका मुलाला सांगितले. नुसतीच लंगोटी घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला अतिशय लाज वाटत होती. पण मास्तर म्हणाले, इथ तर सारी मुलाचं आहेत,त्यांची लाज तुला वाटायची काय कारणे?  मी आपला तसा वळत वर्गात बसलो. पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटली की तेव्हापासून माझ्या स्वभावातील जिद्द काढून टाकायची असा मी मनाशी निश्चय केला. तो कितपत साधला आहे हे इतरांनी मला सांगायचे.

आमचे आडनाव आंबेडकर नव्हते आमचे खरे नाव होते ‘ अंबावडेकर ‘ अंबावडे या नावाचे खेड तालुक्यात दापोली जवळ पाच मैलावर एक लहानशी खेडे आहे, त्यामुळे आम्हाला लोक अंबावडेकर या नावाने ओळखत असे. अंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले?? याचा एक इतिहास आहे.

आम्हाला आंबेडकर नावाचे ब्राह्मण मास्तर होते ते आम्हाला फारसे शिकवत नसत पण माझ्यावर त्यांचे प्रेम होते मधल्या सुट्टीत मला भाकरी खण्यासाठी शाळे पासून खूप दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागते हे आंबेडकर मास्तरांना पटत नव्हते. पण तेवढाच वेळ बाहेर भटकायला मोकळीक मिळेल म्हणून मलाही मधल्या सुट्टीत घरी जाण्याची फार मजा वाटे पण आमचे मास्तरांनी एक युक्ती योजली ते आपल्याबरोबर भाजी भाकरी बांधून आणत असत व रोज मधल्या सुट्टीत कधी न चुकता मला बोलावून घेऊन आपल्या फळांपैकी भाजी भाकरी मला खायला देत. अर्थातच शिवाशिव होऊ नये म्हणून आपले भाजी भाकरी वरूनच माझ्या हातावर टाकीत. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरी ची काही अवीट गोडी असते. त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो. खरोखरच माझ्या मास्तरांचे माझ्यावर प्रेम होते.

एके दिवशी त्यांनी मला सांगितले की अंबावडेकर नाव आदनीड आहे त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे तेच तू यापुढे लाव आणि त्याप्रमाणे त्यांनी तशी कॅटलॉग मध्ये ही नोंद करून टाकली. मी विलायतेत  राउंड टेबल कॉन्फरन्स साठी निघालो तेव्हा त्यांनी मला अत्यंत प्रेमळ पत्र पाठविले ते पत्र माझ्या संग्रही आहे पुढे केव्हातरी माझे आत्मचरित्र लिहिण्याची मला स्फूर्ती झाली तर मी त्यात ते छापणार आहे. ह्या आंबेडकर मास्तरांचे सारे काही औरच होते. शाळेची घंटा झाली की ते वर्गात येतो व रहिमतुल्ला नावाचा एक मोठा मुलगा आमच्या वर्गात असेल त्याच्यावर सोपवून बाहेर निघून जात. हा रहीम  सुद्धा आमच्या वर्गातला एक विद्यार्थी त्याच्या व आमच्या व यात जमीन-अस्मानचा फरक आम्ही दहा दहा वर्षाची मुले तर त्याचे वय पंचवीस तीस वर्षाचे.

संध्याकाळी वर्ग सुटण्याच्या वेळी पुन्हा आमचे मास्तर वर्गात येत व रहिमतुल्ला ला विचारीत कसं काय मुलांनी गडबड  केली नाही ना? नाही असा त्यांनी जबाब दिला म्हणजे ते निश्चित मनाने घरी निघून जातात. हे मास्टर दुपारभर कोठे जाते तसतसे तुम्ही विचाराल आमच्या शाळेचा एक पेपरमेंट आणि सिगारेट विकणार्‍या दुकानात दुकानात शिपाई व शिपायांची मुले देखील काही जिनसा विकत घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या दुकानांचे चांगलीच चलती होती. शाळा चुकवून आमचे मास्तर हिशेब लिहिण्याचे काम करीत असतात त्याबद्दल त्यांना दरमहा वीस पंचवीस रुपयांची प्राप्ती होत असे.

पुढे वार्षिक परीक्षा घेण्यासाठी दिपोटी हजर झाले की आमच्या मास्तरांची तारांबळ  उडत असे. दिपोटी ना वर्गात गणित घातले की मास्तरांनी पाठीवर त्या उदाहरणाचे उत्तर ठळक अक्षरात लिहून ते आम्हाला शेजारच्या खोलीत दिपोडीच्या नकळत दाखवायचे की आमच्या सर्वांची उत्तरे बरोबर यावयाची आणि अर्थात मास्तरांच्या उत्तम शिकवणी बद्दल त्यांना शाबासकी मिळायची. परीक्षा आटोपल्यानंतर संपूर्ण शेरे बुकात आमच्या मास्तरांना उत्तम शेरा मिळाला कडून चहा चिवडा यांच्या नजराना मिळत असे. अशा तऱ्हेने एकदा चांगला शेर मिळाल्यानंतर पुढे वर्षभर चांगली निश्चित असे व आमच्या मास्तर साहेबांना मेहतांजी चे काम निर्धास्तपणे वर्षभर करता येईल.